डॉ दाभोळकर हत्येच्या निषेधार्थ पुणे बंद व निषेध मोर्चां

पुणे,- अंधश्रद्धानिर्मुलनासाठी हुतात्मा झालेलेˆ डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्त्येच्या निषेधार्थ आज पुणे शहरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सकाळी अकरा वाजता पुणे महापालिकेतून हा मोर्चा सुरु झाला व तो दोन तासांनी महात्मा फुलेे मंडईचौकातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे हत्येच्या निषेधाची व डॉ दाभोळकर यांना श्रद्धांजली अर्पण करणारी भाषणे झाली. या मोर्चात सर्व पक्षीय नेते होते. प्रथम महापौर वैशाली बनकर यांनी सर्वांच्या वतीने महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण केला व या कठीण प्रसंगी आपण शांततेने परिस्थितीला सामोरे जावू या असे आवाहन केले. मोर्चात तरुणांची सं‘या मोठी होती. नेत्यांची हत्या करून विचार मरत नसतात ते अधिक जोमाने पुढे जातात, अशा आशयाचे फलक होते. मोठ्या प्रमाणावर रत्यावरही निषेधाच्या घोषणा लिहील्या होत्या.

पुणेकरांनी कोणीही बंदचे आवाहन केले नसताना उत्स्फूर्त बंद पाळला. पुण्यातील डेक्कन जिमखाना, लक्ष्मीरोड, महात्मा गांधी रोड हे गजबजणारे रस्ते आज बंद होते. रस्त्यावरही फारशी वाहतूक नव्हतीे. सायंकाळी महापालिका, एसएमजोशी सभागृह येथे श्रद्धांजलीची सभा झाली.

Leave a Comment