न्यूयॉर्क: आगामी काळात रशियाची टेनिसम्राज्ञी मारिया शारापोव्हाने नाव बदलण्याचा विचार सोडून दिला आहे. शारापोव्हा यूएस ओपनसाठी तिच नाव बदलून ‘शुगरपोव्हा’ असे करणार होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे शारापोव्हाने हा विचार सोडून दिला आहे, अशी माहिती तिचा असिस्टंट मॅक्स आयसेनबडने दिली.
मॅक्स म्हनाला, ‘शारापोव्हा यूएस ओपननंतर लगेचच स्पर्धेसाठी जपान आणि चीनमध्ये जाणार आहे. नाव बदलल्याने अनेक अडचणी येऊ शकतात. तर यूएस ओपनमध्ये प्रवेशपत्रिका पाठवताना शारापोव्हाने आपल्या मूळ नावाचाच वापर केल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
रशियाची नागरिक असेलेली शारापोव्हा अमेरिकेची रहिवासी आहे. त्यामुळेच अमेरिकेत केवळ यूएस ओपनपुरते नाव बदलून घेणार असल्याची चर्चा होती. शारापोव्हाने शुगरपोव्हा या नावाने कँडी आणि च्युईंगगम बाजारात आणले आहे. या ब्रँडच्याच प्रसारासाठी ती नाव शुगरपोव्हा असे करण्याच्या विचारात होती.