साधू यादव कॉंग्रेसमधून बडतफे

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे साधू यादव यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल बडतफ करण्यात आले आहे. बिहार कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी ही घोषणा केली. साधू यादव यांनी गांधीनगरला जाऊन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. देशाचे भवितव्य राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे, असे त्यांनी म्हटले होते.

श्री. साधू यादव ऊर्ङ्ग अनिरुद्ध प्रसाद यांनी आपल्या बडतर्ङ्गीनंतर पत्रकारांशी बोलताना, नरेंद्र मोदी यांच्या विषयी आपण केलेल्या विधानावर ठाम आहोत असे सांगितले. आज भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे नाव दहा वर्षे या पदावर असून सुद्धा अनेकांना माहीत नाही. पण देशातला लहान मुलगा सुद्धा नरेंद्र मोदींना जाणतो ही वस्तुस्थिती आहे असे ते म्हणाले. आपण नरेंद्र मोदी यांची भेट कोणत्याही राजकीय हेतूने घेतली नव्हती, असाही खुलासा त्यांनी केला.

दरम्यान, बिहार प्रदेश कॉंग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख प्रेमचंद मिश्रा यांनी साधू यादव यांची बडतर्ङ्गी आणि त्यांनी केलेली नरेंद्र मोदी यांची स्तुती यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल पक्षातून हाकलण्यात आलेले आहे, असे श्री. मिश्रा म्हणाले.

Leave a Comment