विहिंपच्या अयोध्या यात्रेला बंदी

लखनौ – विश्‍व हिंदू परिषदेने चालू आठवड्याच्या शेवटी आयोजित केलेल्या अयोध्या यात्रेला राज्य सरकारने अनुमती नाकारली आहे. विश्‍व हिंदू परिषदेतर्ङ्गे राम मंदिराचे राजकारण पुन्हा सुरू केले आहे आणि १४ ऑक्टोबरपासून राम मंदिर बांधणीची मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही संत आणि साधू यांच्या सोबत ३०० कि.मी. ची अयोध्या यात्रा काढण्याचा निर्णय या संघटनेने घेतला होता. परंतु राज्य सरकारने या यात्रेवर बंदी घातली आहे.

गेल्या आठवड्यात विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी मुलायमसिंग यादव यांची भेट घेऊन राम मंदिराच्या संबंधातील राजकारणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राज्य सरकार अयोध्या यात्रेला परवानगी देईल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र मुलायमसिंग यादव यांच्या या भेटीमुळे राज्यातल्या मुस्लीम नेत्यांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांनी मुलायमसिंग यादव यांना संघ परिवाराशी संबंध न वाढविण्याचा इशारा दिला.

या इशार्‍यामुळे राज्य शासनाने अयोध्या यात्रेवर बंदी घातली असल्याची चर्चा होत आहे, परंतु मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी परवानगी नाकारण्यामागे कसलेही राजकारण नसल्याचा खुुुलासा केला आहे. उच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाबतीत जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे तिथे बांधकाम सुरू करण्याच्या हेतूने काढण्यात येणारी ही यात्रा त्या आदेशाचा भंग ठरणार आहे. म्हणून राज्य सरकारने अनुमती नाकारली असल्याचे श्री. अखिलेशसिंग म्हणाले.

Leave a Comment