पाऊस भरपूर आणी समस्यांचा महापूर

पुणे,ˆ – विद्यमान वर्ष हे विक‘मी पाऊस, विक‘मी धान्योत्त्पादन तरीही शेतीच्या विक‘मी समस्या असे हे वर्ष असणार आहे.एका बाजूला मोठ्या प्रमाणावर सामान्य गरीबीरेषेखालील लोकांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर नाममात्र किंमतीत धान्य मिळणार आहे, हे चांगली बाब आहे पण त्यामुळे शेतीमालाच्या खरेदीच्या व विक‘ीच्या भावावर विपरीत परिणाम होणार आहे. काँग‘ेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुण्यात या आठवड्यात त्यांच्या पक्षाच्या वतीने जाहीर केले की, देशातील 84 टक्के जनतेला अन्नसुरक्षा कायद्यातून घरटी पंधरा किलो धान्य हे तीस रुपयांत मिळणार आहे. त्यासाठी पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांचे आभार मानणारी राज्यातील पंचवीस लाख लोकांच्या सह्यांची पत्रे संकलित करण्याची प्रकि‘ या सुरु झाली आहे. येवढ्या मोठ्याप्रमाणावर धान्य लोकांपर्यंत येणार असल्याने नव्या हंगामात धान्य कसे खरेदी करावे याबाबत व्यापार्‍यांच्या मनात संभ‘म निर्माण झाला आहे. त्यामुळे विक‘मी उत्पादन होवूनही यावर्षी शेतीमालाचे भावावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे.

याच आठवड्यात पुण्यात पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांनी झालेल्या वर्षातील धान्योत्त्पादनाची जी माहिती दिली त्यानुसार देशात 26 कोटी 90 लक्ष टन धान्योत्त्पादन झाले आहे आणि विद्यमान चांगल्या पावसामुळे येणार्‍या वर्षातही चांगले धान्योत्त्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अर्थिक वर्षात गहू, तांदूळ, साखर, कापूस व मासे मिळून यांची 32 हजार कोटीरुपयांची निर्यात झाली आहे. केंद्र सरकारने अन्नसुरक्षा विधेयक संसदेत मांडले आहे. त्यानुसार गरिबीरेषेखालील लोकांना दोन रुपये दराने तांदूळ, तीन रुपये दराने गहू आणि एक रुपयादराने भरडधान्य असे देण्यात येणार आहे. याच वेळी शेतकर्‍याकडे विक‘मी धान्य उत्पादन झाल्याने ग‘ाहकांच्या धान्य खरेदीवर त्याचा परिणाम होणार आहे. यावेळी विक‘मी पातळीवर धान्यखरेदीचे भावे घसरतील, असे दिसते आहे. शासनाला शेतकर्‍यांची धान्य खरेदी व अन्नसुरक्षा कायद्यानुसार नाममात्र किमतीत धान्य विक‘ी यांचा समतोल जर नीट बसला नाही तर ज्या शेतकर्‍यांनी शेतीसाठी कर्जे काढली आहेत त्यांना जर कृषीमालाला चांगला भाव मिळाला नाही तर त्या शेतकर्‍यांच्यात पुन्हा आत्महत्या सुरु होतील काय अशी भीती वाटू लागली आहे.

दि.14 ऑगष्टपर्यंतच्या पावसाच्या स्थितीनुसार राज्यात सुमारे दीडपट पाउस झाला आहे. सर्वात अधिक प्रमाणात पाउस चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे म्हणजे तेथील आजपर्यंतच्या पावसाच्या प्रमाणात 88टक्के पाउस जादा झाला आहे. त्या खालोखाल गंडचिरोलीजिल्ह्यात 99 टक्के जादा पाउस झाला आहे. म्हणजे दुप्पट पाउस झाला आहे. त्या खालोखाल भंडारा जिल्ह्यात 95 टक्के जादा, यवतमाळमध्ये 92 टक्के जादा, वाशिमजिल्ह्यात 89 टक्के जादा, नागपूर जिल्ह्यात 88 टक्के जादा, गोंदियात 83 टक्के जादा अशी स्थिती आहे . महाराष्ट्रातील औरंगाबाद, सांगली व सोलापूर , कोल्हापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त अनुक‘मे 14, 7, 12, 12 आणि 17 टक्के असा जादा पाऊस झाला आहे. कोणत्याही जिल्ह्यात कमी पाउस झालेला नाही. उपलब्ध माहितीनुसार इतकी चांगली स्थिती यापूर्वी झाल्याची नोंद नाही. याखेरीज धुळे जिल्ह्यात 75 टक्के जादा पाउस झाला आहे तसेच वर्धा 62 टक्के जादा, नांदेड 56 टक्के जादा, बुलढाणा 54 टक्के जादा, हिंगोली 52 टक्केजादा अशी पावसाची स्थिती आहे. बाकी महाराष्ट्रात म्हणजे पश्चिममहाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वीस ते 42 टक्के जादा पाऊस आहे. ही जशी राज्याची स्थिती आहे त्याप्रमाणे देशातही बिहार, झारखंड व आसामक्षेत्रातील सर्व छोटी राज्ये येथे सुमारे चाळीस टक्के पाऊस कमी आहे. प.बंगालमध्ये पंधरा टक्के पाऊस कमी आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, ओरिसा, किनारपट्टीचा आंध‘प्रदेश, तामीळ नाडू आणि उत्तर कर्नाटक या प्रदेशात सरासरीयेवढा आहे आणि मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान, छत्तीस गड, केरळ, दक्षिण कर्नाटक येथे सुमारे 30 टक्के जादा पाऊस आहे. त्यामुळे देशातील शेतीची स्थिती यावर्षी चांगली राहणार आहे. पण हवामान तज्ञांनी एका बाबीची पूर्व कल्पना देवून ठेवली आहे की, यावर्षी रब्बी हंगामात पाउस कमी पडण्याची शक्यता आहे कारण ज्या वर्षी खरीप हंगामात जादा पाउस पडतो तेंव्हा रब्बीत पाउस कमी पडत असतो. शेतकर्‍यंानी रब्बीचे व्यवस्थापन त्या पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे.
ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ ˆˆˆˆˆ

Leave a Comment