सलमानच्या हिट अँड रन केसची आज सुनावणी

मुंबई: अभिनेता सलमान खानवर हिट अँड रन केसप्रकरणी मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यानपुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सलमानला किक चित्रपटाच्या शुटींगसाठी परदेशी जायचे आहे. मात्र आजच्या सुनावणीमुळे कोर्टाने त्याला परदेशी जाण्या्साठी परवानगी दिलेली नाही. त्या‍मुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

सलमानच्या गाडीने २८ सप्टेंबर २००२ रोजी पाच जणांना चिरडले होते. यामध्येस एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल अकरा वर्षांनंतर सलमानवर आरोपांची निश्चिती झाली. दरम्यान यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने सलमानवर कडक ताशेरे ओढले होते. सलमान खानला अशा बेदरकार ड्रायव्हिंगमुळे कोणाचाही जीव जावू शकतो याची पूर्ण कल्पना होती. तसंच सलमानच्या बॉडीगार्डने त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांची कल्पना दिली होती, पण त्याने जाणूनबजून गाडी वेगात चालवणं सुरुच ठेवलं, असे कोर्टाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे.

यापूर्वी २४ जूलै रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये अभिनेता सलमान खानवर हिट अँड रन केसप्रकरणी मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्या.पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यारमुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment