मुंबईच्या लोकलमध्ये अमेरिकी महिलेवर हल्ला

मुंबई – मुंबईच्या मरिन लाईन्स् ते चर्नीरोड या स्थानकाच्या दरम्यान पहिल्या वर्गाच्या लोकलच्या डब्यातून प्रवास करणार्‍या अमेरिकी महिलेवर अज्ञात चोरट्याने हल्ला केला. तिला जखमी केले आणि तिच्याजवळचा मोबाईल ङ्गोन तसेच बॅग घेऊन पलायन केले. ही घटना दुपारी पाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

मुंबईत एकट्याने ङ्गिरणार्‍या महिला सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. कारण लोकलमधून प्रवास करणार्‍या एकट्या महिलेवर हल्ला होण्याची गेल्या महिनाभरातली ही दुसरी वेळ आहे. काल हल्ला झालेली महिला मायकेल मार्क ही गेल्या वर्षभरापासून मुंबईत आहे. ती एका स्वयंसेवी संघटनेचे काम करत आहे. ती चर्चगेट स्टेशनवरून बोरीवलीला जाणार्‍या स्लो लोकलमध्ये चढली. ती डब्यात एकटीच आहे असे बघून या चोरट्याने आत प्रवेश केला आणि तिच्याजवळच्या वस्तू हिसकावून घेऊ लागला.

या महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु या चोरट्याने तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले. त्यात ती जखमी झाली. दरम्यान, ग्रँट रोड स्टेशनवर हा चोरटा पळाला आणि पुढच्या चर्नीरोड स्टेशनवर जखमी अवस्थेतली ही महिला खाली उतरली. काही प्रवाशांनी तिची ही अवस्था बघून तिला आधी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांना कल्पना दिली आणि तिला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती आता सुधारत आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चोरट्याचा तपास सुरू केला आहे.

Leave a Comment