अनुष्काला विसरणे झाले रणवीरला कठीण

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या एक्स गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्माला अजुन विसरू शकला नाही. रणवीर ‘बैंड बाजा बारात’ या सिनेमात त्याची को-स्टार असलेल्या अनुष्का शर्मा सोबत काही काळ तो डेट करीत होता. मात्र त्यांचे हे रिलेशनशिप जास्त दिवस न टिकल्याने दोघेजण लगेचच वेगळे झाले.

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार रणवीर अजूनही अनुष्काला विसरू शकला नाही. नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीरने अनुष्का एक चांगली मुलगी आहे. तिला मी नेहमीच मिस करतो, असे तो म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून यशराज प्रॉडक्शन हाउसमध्ये अनुष्का दिसली नाही. त्यामुळे माझा ‍तिची भेट झाली नाही. आतापूर्वी प्रमाणे आम्ही दोघे जवळ नसल्याचे यावेळी रणवीरने कबूल केले.

रणवीर-अनुष्काची ‘बैंड बाजा बारात’ या ‍सिनेमापासून चांगलीच केमेस्ट्री जुळली गेली होती. प्रेक्षकांनापण ही जोडी पसंत पडली होती. सध्या रणवीर-दीपिका पादुकोणच्या मागे पुढे करीत असतो. मात्र या रिलेशनबाबत रणवीर काहीच बोलण्यास तयार नाही.

Leave a Comment