‘बँग बँग’च्या शुटसाठी हृतिक सज्ज

बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानतर त्याला काही दिवस आराम घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या. महिनाभराच्या विश्रातीनंतर तो आता सिद्धार्थ आनंदच्या ‘बँग बँग’ या सिनेमाच्या शुटच्या तयारीला लागला आहे. काही दिवस शुटला सुटी द़यावी लागल्याने कैटरिना-हृतिक या जोडीचा ‘बँग बँग’ बहूचर्चीत सिनेमा आता २ ऑक्टोबर २०१४ ला रिलीज होणार आहे.

२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटानंतर कतरिना-हृतिक पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याबाबत बोलताना अभिनेता हृतिक रोशन म्हणाला, ‘मी आता पूर्णपणे तंदुरूस्त झालो आहे. त्यामुळे लवकरच ‘बँग बँग’च्या टीमसोबत काम करण्यास सुरूवात करणार आहे. पूर्वीपेक्षा आता मला रिलीफ वाटत आहे. नव्या दमाने व उत्साहाने मी कामाची सुरूवात करीत आहे. ‘

सध्या हृतिक ‘क्रिश ३’ च्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त असल्यामुळे तो नोव्हेंबरपासून शुटला सुरुवात करणार असल्याचे सिद्धार्थने सांगितले. ‘बॅग बॅंग’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून चित्रपट मे ऐवजी २ ऑक्टोबर २०१४ ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment