जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही-माणिकराव

पुणे- आगामी काळात होत असलेल्या. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर जागावाटपासंदर्भात काँग्रेस अ‍ाणि राष्ट्र वादी काँग्रेस मध्ये कसलीच चर्चा आतापर्यंत झाली नाही. त्याशिवाय राज्यात २६-२२ चा फॉर्म्युला ठरलेला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी लगावलेला टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना यांना जिव्हारी लागला होता. आपण राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी बोलत नाही असेही पवारांनी ठाकरे यांना उदेशून म्हटले होते. राज्यात २६-२२चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहितीही पवार यांनी दिली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचे सांगून माणिकराव ठाकरे यांनी नव्याआ चर्चेला तोंड फोडले आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी आपली चर्चा झाली असून राज्यातील काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. त्याकमुळे माणिकरांवांनी पवारांच्या या टीकेला उत्तर दिले असल्याचे मानले जात आहे.