सैफच्या आगामी चित्रपट दिसणार बेगम करीना

नवाब सैफअली खानच्या आगामी चित्रपटात त्याच्यासह बेगम करीना कपूरही दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सैफअली खान स्वतः प्रोड्यूस करणार असून यात तो करीनाला घेण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “हॅप्पी एन्डिंग” असे सैफच्या या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. राज निदिमोरू कृष्णा आणि डीके या चित्रपटाच दिग्दर्शन करणार असून, याचा प्रोड्यूसर सैफअली खान तसेच दिनेश विजन आहे. इलियाना डीक्रूज यात मुख्य भूमिकेमध्ये असेल तर करीना यात विशेष भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment