साहित्यसंमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी 1069 मतदार

पुणे, – सासवडयेथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाकरीता होणार्‍या निवडणुकीसाठी 1069 मतदारांची अधिकृतयादी संमेलनाचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी आज प्रकाशित केली. यादीनुसार अधिकृत सदस्य, भावी अध्यक्षाची निवड करणार असून, अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 17 ऑगस्ट सायंकाळी सात वाजेपर्यंत आहे.
संमेलनाचे पूर्वाध्यक्ष 14, महाकोषाचे विश्‍वस्त 9 यासंहित प्रामुख्याने महाराष्ट्र साहित्यपरिषद पुणे, मराठवाडा साहित्यपरिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्यसंघ नागपूर आणि मुंबई मराठी साहित्यसंघ, मुंबई या चार घटक संस्थांचे प्रत्येकी 175 सदस्य(एकूण 700) तसेच समाविष्ट संस्थांपैकी मराठी साहित्यपरिषद, हैदराबाद, कर्नाटक राज्यमराठी साहित्यपरिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्यपरिषद, भोपाळ, मध्यप्रदेश, गोमांतक साहित्यसेवक मंडळ, पणजी आणि छत्तीसगड मराठी साहित्यपरिषद बिलासपूर यांचे प्रत्येकी 50 सदस्य(एकूण 250) त्याचप्रमाणे मराठी वाङ्मयपरिषद, बडोदा, गुजरात या सलग्न संस्थेचे 11 सदस्य, आणि सासवड येथील निमंत्रक संस्थेचे 85 सदस्य असे एकूण 1069 सदस्य मतदार आहेत.
अध्यक्षपदाकरीता अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट असून, त्याच दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर निवडणूक अधिकारी उपलब्ध अर्जांची छाननी करून, अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करतील. त्यानंतर 24 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.त्याच दिवशी रात्री 8 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 4 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडे मतपत्रिका पोस्टाने पाठविण्यात येतील. 15 ऑ्नटोबरपर्यंत मतदारांकडून मतपत्रिका निवडणूक अधिकायर्‍यांकडे पाठवावयाच्या आहेत. तर 16 ऑ्नटोबरला मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यातयेईल, असे अ‍ॅड. आडकर यांनी सांगितले.

Leave a Comment