
पुणे, – मराठा समाजाचा जो लढा सुरु आहे तो ओबीसीमधीलच 25 टक्के आरक्षणासाठी सुरु आहे, त्याच बरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण नको , असे मत शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार विनायकराव मेटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

पुणे, – मराठा समाजाचा जो लढा सुरु आहे तो ओबीसीमधीलच 25 टक्के आरक्षणासाठी सुरु आहे, त्याच बरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण नको , असे मत शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार विनायकराव मेटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
याच आठवड्यात मराठा आरक्षण समिती येत्या शनिवारी पुण्यात येत जनतेने लेखी स्वरुपात आपले निवेदन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून त्याच्याशी आम्ही सहमत आहे. आम्हाला ओबीसीमधील 25इक्के आरक्षण हवे असून त्यामध्ये राजकीय आरक्षण न देता शिक्षण, उद्योग आदिंमध्ये हे आरक्षण द्यावे.
आरक्षणाच्या मसुद्यावर शासनाने राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या अध्यक्षस्थानी बापट यांची नियुक्ती करून त्यांनी राज्यभर फिरल्यानंतर अहवाल तयार केला. या अहवालावर समितीतील पाच सदस्यांपैकी तीन सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे जाहीर केले. परंतू बापट आयोगाने शासनाला अहवाला सादर करताना विरोधात पाठविला. त्यानंतर हा अहवाल पुनर्विचारासाठी पुन्हा सन 2009 मध्ये आयोगाकडे पाठविण्यात आला. परंतु या आयोगाने जुन 2013 मध्ये फेरविचार करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. या आयोगाने चार वर्षे हा निर्णय देण्यासाठी कशासाठी घेतले असा प्रश्न उपस्थितीत करीत या आयोगाकडून जातीयवाद होत असून त्यावरील सदस्यांना त्वरीत निलंबित करा, अशी मागणीही मेटे यांनी केली.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांची समिती शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहे. या समितीसमोर विविध सामाजिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी आपले म्हणणे तोंडी स्वरुपात न सांगता लेखी स्वरुपात सादर करा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसंग्रामने सुरु केलेला मराठा आरक्षण जागर आंदोलन यापुढेही असेच चालू राहणार असून शासनाने निवडणुकीच्या आचारसहिंतेपूर्वी आरक्षण दिले नाही तर तीव्र स्वरुपात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला.