नौदलाच्या सिन्धुरक्षक पाणबुडीवर स्फोट, 18 जवानांचा मृत्यू

मुंबई – मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळे अफरातफर माजली. नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्ताने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणलें पाणबुडीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटानंतर नौदलाचे 18 जवानांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. आगीचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत.

मुंबईच्या कुलाब्यातल्या नौदल डॉकयार्डात मंगळवारी रात्री 12 वाजता भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की नौदलाचे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले. ही आग भडकताच मुंबई अग्निशमन दलाच्या तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या किमान 16 पथकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं असून या तळावरील इतर नौकांना असलेला आगीचा धोका टळला आहे. नौदलानं घडल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 15 ऑगस्टच्या 1 दिवस आधी लागलेली आग अनेक प्रश्न उपस्थित करतेय. सुरुवातीला या पाणबुड्यांमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर मोठमोठाल्या आगीच्या ज्वाळा आकाशात दिसू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. स्फोटांचा आवाज इतका भीषण होता की भिंतींनाही तडे गेले आहेत.

सिंधुरक्षक पाणबुडीला लागलेली आग हळुहळू इतर पाणबुड्यांना आपल्या विळख्यात घेऊ लागली. हे पाहून त्यातल्या खलाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेनंतर मुंबई तटरक्षक दलाला अलर्ट देण्यात आला आहे. मात्र इतक्या संवेदनशील परिसरात आग कशी लागली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. दरम्यान, आगीनंतर आता सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळाली आहे.

Leave a Comment