अक्षयला घ्यायचंय दुबईत घर

बॉलिवूड मधल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. आता आपल्या अक्‍शन किंग असलेल्या अक्षय कुमारलाच दुबईत घर घ्यायचे आहे. या ठिकाणी सध्या अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी नवे घर शोधत आहे. अक्षयच्या आधीच याठिकाणी बॉलीवूडमधील शाहरुख खान, ऐश्वर्य़ा राय बच्चन, शिल्पा शेट्टी आणि सोहेल खान यांचे दुबईत घर आहेत. त्यामुळेच आता येथील घराच्या प्रेमात अक्षय पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा दुबईत त्याचा चित्रपट ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’च्या प्रमोशनसाठी आला आहे. यावेळी बोलतांना अक्षय म्हणाला, “ गेले काही दिवस मी पूर्णपणे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, पण माझी बायको म्हतणजेच ट्विंकल मात्र आमच्यासाठी नवीन घर शोधत आहे“

तसे पाहिले तर दुबई एक जिवंत शहर आहे. येथे आल्यावर आपले दुसरे घर असल्यासारखे वाटते. आम्ही याठिकाणी कामानिमित्त अनेकदा येतो. त्यामुळे येथे घर घेण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अक्षय म्हणाला. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचे काम पडल्यास त्यांचे स्वप्नातले घर तिथे तयार असावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

Leave a Comment