रणबीरसाठी दीपिका सोडणार दोस्ताना

शाहरुख आणि दीपिकाच्या यशामुळे चाहते रणबीरला विसरतील असतील असे वाटत होते. मात्र असे असले तरी दीपिका तिचा जूना मित्र रणबीरला विसरण्यास तयार नाही. रियल लाईफमध्ये नाही तरी रील लाईफमध्ये दीपिका रणबीरसोबत राहण्याची एकपण संधी सोडत नाही. त्यामुळेच आता रणबीरसाठी दीपिका आगामी दोस्ताना हा सिनेमा सोडणार असल्याचे समजते.

यापूर्वी दोस्ताना सिनेमात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा यांनी काम केले होते. या सिनेमाचे सिक्वल आगामी काळात येत असून यामध्ये देसी गर्ल दीपिकाला पहिली पसंती देण्यात आली होती. दीपिका दोस्तानामध्ये लीड रोल करणार होती. त्याचे शुट ऑक्टोबरमध्ये सुरू होणार होते. तरुण मनसुखानीने सिक्वलची तयारी सुरू केली होती मात्र करन जौहरला स्क्रिप्ट पसंत पडली नाही म्हणून सिनेमाचे काम रखडले होते.

दुसरीकडे इम्तियाज अली रणबीर कपूर आणि दीपिकाला सोबत घेवून नवीन सिनेमाची तयार करीत आहे. इम्तियाजच्या या सिनेमाचे शुट जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे दोस्ताना व रणबीरच्या सिनेमाच्या शुटच्या तारखा एकत्र येत असल्याने दीपिकाने रणबीरसोबत काम करण्यास मिळावे म्हणून दोस्ताना सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment