संजय दत्त करणार कैद्यासोबत कार्यक्रम

अभिनयाचे वेड कुठे गेले तरी बसू देत नाही असेच काहीसे अभिनेता संजय दत्तच्याड बाबतीत झाले आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगणा-या कैद्यांनी आगामी काळात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये कैदयांचा सहभाग असणार आहे. या कार्याक्रमात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तही सहभागी होणार असल्या चे खात्रीलायक माहिती आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार असल्याचे समजते.

येरवडा कारागृहातील या कार्यक्रमात काम करण्याची तयारी असल्याचे संजय दत्तने कारागृह प्रशासनाला कळविले आहे. त्याममुळे त्या चा सहभाग निश्चीतत मानला जात आहे. सध्याच्या आधुनीक काळातही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे महत्त्व सांगणारा हा कार्यक्रम कैद्यांनी तयार केला आहे. यामध्ये नाटिका आणि नृत्य बसविण्यात आले आहेत.

यामध्ये परदेशात राहणारा भारतीय व्यक्ती त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटतो व आपल्या संस्कृतीची माहिती जाणून घेतो, असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. त्याचे संवाद, नृत्य दिग्दर्शन आदी सर्व कैद्यांनीच केले असल्याचे समजते.गणेशोत्सवानंतर हा कार्यक्रम नागरिकांसाठी दाखविण्यात येणार आहे. त्यासाठीचे ठिकाण मात्र अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती येरवडा कारागृहातील प्रशासनाने दिली आहे.

Leave a Comment