चेस्टर ली स्ट्रीट – अशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात इंग्लंडच्या इयान बेलने १०५ धावा करत नाबाद शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुस-या डावात तिस-या दिवसअखेर २०२ धावांची मजबूत आघाडी घेतली. इयान बेल व टीम ब्रेसनन खेळत आहेत.

तिस-या दिवशी ऑस्ट्रेलिया चांगली आघडी घेईल असे वाटत असताना त्यांचा पहिला डाव सर्वबाद २७० धावावर आटोपला. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेता आली. रविवारी कांगारूंनी उर्वरित पाच विकेट अवघ्या ४८ धावांत गमावल्या. पाहुण्या संघाकडून रोर्जसने सर्वाधिक ११० तर वॉटसनने ६८ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने ७१ धावांत ५ तर अॅधडरसन व ग्रीम स्वान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दरम्यान, दुस-या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या ४९ धावांत इंग्लंडचे अलेस्टर कुक जो. रुट, जोनाथन ट्रॉट तीन प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ऑस्ट्रेलिया संघाची सामन्यावर पकड मजबूत होत आहे, असे वाटत असताना मधल्या फळीत पीटरसन आणि बेल यांनी चौथ्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. मात्र, लियोनने पीटरसनला बाद केले. संक्षिप्त धावफलक इंग्लंड : २३८ ऑस्ट्रेलिया : २७०. इंग्लंड दुसरा डाव ५ बाद २३४.