‘राम लीला’त काम करणार नाही ऐश्वर्या

आगमी काळात येत असलेल्या फिल्मकार संजय लीला भंसाळीच्या’ ‘राम लीला’ सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या रॉय झळकणार अशा अफवा पसरविण्यात आल्या‍ आहेत. याबाबतचा खुलासा स्वता फिल्मकार संजय लीला भंसाळी यांनीच केला आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय आइटम सॉग सादर करणार नसल्यातचे सांगून त्यांनी याबाबत गेल्या् काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना पुर्णविराम ‍दिला आहे.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांमुळे फिल्मकार संजय लीला भंसाळी अडचणीत सापडले होते. त्या मुळेच त्यांना याचा खुलासा करावा लागला आहे. काही दिवसांपासून ऐश्वर्या रॉय एक आइटम सॉंगमधून सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. ऐश्वर्या सोबत भंसाळीने ‘देवदास’ आणी ‘गुजारिश’ सिनेमा त्यांनी केल्याने काही जणाला हे शक्य वाटत होते.

यापूर्वी ‘राम लीला’ सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आयटम सॉग करणार अशी अफवा होती. त्यांनतर कही दिवसातच माधुरी दीक्षितचे नाव पुढे आला आता ते झाल्यानंतर ऐश्वर्या रॉयचे नाव तेजीत आहे. ऐश्वर्याने पण व्यक्तिगत रित्याव याबाबत काहीच दुजोरा दिला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या. आराध्या हीच तिची प्राथमिकता आहे. दूसरीकडे सूत्राच्या माहितीनुसार आगामी काळात हिमेश रेशमियाच्‍या १९८३ सालच्या ‘मासूम’ सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या काम करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment