सलमान आणि कैटरिना नंबरवन

टाइम सेलेबेक्स वेबसाइटच्या सर्वेनुसार बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आणि बॉर्बी गर्ल कैटरीना कैफने नंबरवनचा किताब मिळवला आहे. टाइम सेलेबेक्सच्या सर्वेक्षणावेळी सलमानने शाहरुख, आमिर, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्याशी जोरदार स्पर्धा झाली. त्यामध्ये सलमानने सलग सातव्यावेळा अव्वलस्थान टिकवून ठेवले आहे.

जून महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये अभिनेता सलमानला ५१.५ गुण मिळाले. तर दुस-या स्थानी असलेल्या अभिनेता रणबीर कपूरला ४४ गुण मिळाले आहेत. तर त्या तुलनेत किंगखान शाहरुखला ३५ गुण घेवून तिस-या स्थानी आहे. अमिताभ बच्चनला २९ गुण मिळाले आहेत तर अभिनेता आमिर खानला २७ गुण मिळाले आहेत.

अभिनेत्रि कैटरीना कैफ सहाव्या वेळा सर्वेक्षणात पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. अभिनेत्री कैटरीना या सर्वेमध्ये ३८ गुण घेवून पहिल्या स्थानावर आहे. तर याच स्थानासाठी शेवटपर्यांत रेसमध्ये असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण ३४.३ गुणासह दूस-या स्थानावर आहे. अभिनेत्री सोनम कपूर ३४ गुणसह तिस-या स्थानवार आहे. करीना कपूर ३३ गुणसह चौथ्या स्थनावर आहे. तर २७ गुण घेवून सोनाक्षी सिन्हा पाचव्या स्था‍नावर आहे.

टाइम्स सेलेबेक्स वेबसाइटवर बॉलीवुडच्या सर्वच नायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या‍मध्ये बॉक्स ऑफिसची सफलता, त्यांची जाहीरात, सोशल नेटवर्किंग साइट आणि इंटरनेटवरील सक्रियता बघून हे गुण देण्यात आले आहेत.

Leave a Comment