सनी ठरली हिट सर्च अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीमध्ये नेहमीच नंबर वन कोण यासाठी स्पर्धा सुरु असते…मग ती कतरिना कैफ असो…प्रियांका असो. दीपिका असो किंवा करीना …मात्र या सर्व अभिनेत्री मागे टाकत अभिनेत्री सन्नी लिओन नंबर वन ठरली आहे. तिने २०१३मध्ये नेटवर ऑनलाईन मोस्ट सर्च अभिनेत्री ठरण्याचा मान तिने पटकावला आहे.

२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल स्थान पटकावित तिने बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना मागे टाकले आहे. त्या‍मुळे अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ऑनलाईन तिला सर्च करणारा हा आकडा साधासूधदा नसून चक्क ३.५०कोटींच्या घरात पोहचला आहे. जो आत्तापर्यंत इंडियातील कोणत्याही स्टार्सच्या वाट्याला आलेला नाही. आत्तापर्यतच्या भारतीय स्टार्सची आकडेवारी पाहिली तर ती आघाडीवर असल्याचे दिसते.

गेल्यान काही दिवसांपासून सन्नी लिओनचे काम अगदी तिला नंबर वन अभिनेत्री ठरवत आहे. त्यामुळे आगमी काळात बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून नव्हे तर मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी म्हणून सर्वांनी तिचा धसका घेतला आहे.

Leave a Comment