शाहरुखवर गर्भलिंग तपासणी केल्याप्रकरणी खटला दाखल

मुंबई – बॉलिवूड चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईच्या एका स्थानिक न्यायालयात गर्भलिंग तपासणी केल्याप्रकणी लिंग परिक्षण निरोधक अधिनियम अंतर्गत आज (शुक्रवार) खटला दाखल करण्यात आला आहे. शाहरुखने भाडोत्री गर्भातून जन्माला येणार्‍या मुलाचे लिंगपरिक्षण
केल्यामुळे लिंग परिक्षण कायद्याचे उल्लंघन झाले आहे असा आरोप करत वकिल वर्षा देशपांडे यांनी कोर्टात शाहरुख विरोधात याचिका दाखल केली आहे.

47 वर्षीय शाहरुखने आपल्या तीसर्‍या आपत्याला जन्म देण्यासाठी भाडोत्री मातेचा वापर केला होता. शाहरुखने लिंग परिक्षण केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर वर्षा यांनी सर्वात पहिले बृहमुंबई नगर निगमच्या आरोग्य विभागात या विरोधात तक्रार केली होती. यानंतर या विभागाच्या अधिकारी 17 जूनला घटनेच्या पडताळणीसाठी शाहरुखच्या घरी गेले होते. परंतु त्यांना परत यावे लागले.

तसेच शाहरुखनेही लिंग परिक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप फेटाळले होते. अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट उदय पडवड यांनी शाहरुखवर लिंग
परिक्षण निरोधक अधिनियम अंतरर्ग दाखल झालेल्या खटल्याचे सुनावणीची तारीख 12 सप्टेंबरला होणार असल्याचे निश्चित केले आहे.

Leave a Comment