रत्नाकर बँकेने खरेदी केला रॉयल बँकेचा हिस्सा

मुंबई – रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने त्यांच्या बिझिनेस बँकींग, के्रडीट कार्ड, मॉर्टगेज व्यवसायाचा हिस्सा कोल्हापूरच्या रत्नाकर बँकेला देण्याचा करार केला असल्याचे वृत्त आहे. रत्नाकर बँक ही कोल्हापूरमधील छोटी खासगी स्वरूपाची बँक आहे. विशेष म्हणजे २००८ पर्यंत रॉयल बँक जगातील मोठ्या बँकांच्या ग्रुपमधील एक बँक होती तर रत्नाकर बँकेची व्याप्ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे.

या नव्या करारानुसार रत्नाकर बँकेकडे आरबीएस चे १.२ लाख ग्राहक डायव्हर्ट होणार आहेत. हा करार किती रकमेला केला गेला याची माहिती दिली गेलेली नाही. मात्र तीन वर्षांपूर्वीच रॉयल बँकेने कमर्शियल व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार रॉयल बँकेकडे सुमारे ९० हजार के्रडीट कार्ड, २,४४८६२ डेबिट कार्ड ग्राहक आहेत. त्यांची ३५ ऑनसाईड आणि ८५ ऑफ साईड एटीएम आहेत.

रॉयल बँक बंगलोर, चेन्नई, दिल्ली, गुरगांव, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई, नॉईडा, पुणे व बडोदा या दहा शहरातील शाखा रत्नाकर बँकेकडे देणार आहे. या करारामुळे रिटेल आणि कझ्युमर बँकींग क्षेत्रात प्रवेशाची आमची इच्छा पूर्ण झाली आहे असे रत्नाकर बँकेचे प्रमुख नितीन चोप्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की के्रडीट कार्ड व्यवसायाची संधीही या निमित्ताने आम्हाला मिळत आहे त्यामुळे आमचा ग्राहकवर्ग वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे.

Leave a Comment