जागतिक बॅडमिंटन- सिंधूचे कांस्यपदक निश्चित

ग्वांगजो(चीन)- चीनच्या शिक्सियन वँगचा पराभव करत भारताच्या पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. या विजयासह भारताने स्पर्धेतील कांस्यपदक निश्चित केले आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चीनच्या शिक्सियन वँगचा 21-18 आणि 21-17 असा पराभव केला. सिंधून वँगचे आव्हान 55 मिनिटात संपुष्ठात आणले.

त्याआधी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सायना आणि कश्यपचे आव्हान संपुष्ठात आल्याने सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते.