नवी दिल्ली – दक्षिण कोरियास्थित एलजी या कंपनीचा नवा स्मार्टफोन बाजारातील स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. एलजी-जी2फ हा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये दिसणार आहे. स्मार्टफोन – एलजी-जी2 हा सुरुवातीला अमेरिकेच्या मार्केटमध्ये लॉन्च होईल.
एलजी -जी 2… स्मार्टफोन बाजारात येण्यासाठी सज्ज
या फोनची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवणंच कंपनीने पसंत केले आहे. या हाय-स्पीड फोनचा क्वॉलकॉम क्वाईड-कोर स्नॅपड्रॅगॉन 800 चिपसेटची क्षमता 2.26 गिगाहर्टझ एव्हढी आहे. जी2 हा अॅन्ड्रॉईड फोन असून जेली बीन 4.2.2. इतकी त्याची क्षमता आहे.
या फोनची फूल एचडी स्क्रिन (1080 ु 1920) 5.2 इंचाची आहे. तर या फोनचा डिसप्ले 423 पिक्सल पर इंच एवढा आहे. या फोनचा कॅमेरा 13.0 मेगापिक्सल
आहे तर फ्रन्ट कॅमेरा 2.1 मेगापिक्सल एवढा आहे.
