गुजरातच्या औद्योगिक प्रगतीचे शरद पवारांकडून गुणगान

मुंबई -केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातच्या औद्योगिक प्रगतीची प्रशंसा केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांव न घेता पवार म्हणाले की शेजारील गुजरात राज्यात औद्योगिक गुंतवणुकीबाबत राजकीय मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र येतात आणि एकजुटीने गुंतवणूक गुजरातेतच होईल याची काळजी घेतात. महाराष्ट्रात मात्र कोणताही उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव आला की प्रथम त्याला विरोध करण्यासाठी अॅक्शन कमिट्या स्थापन केल्या जातात. येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

पवार म्हणाले महाराष्ट्रात उद्योग सुरू होण्यापूर्वीच विरोध सुरू होतो. परिणामी गुंतवणूक करू इच्छीणार्याा अनेक उद्योजकांपुढे अडचणी उभ्या राहतात. औद्योगिकरणामध्ये राजकारण आणले जाऊ नये. गुजरातेत गुंतवणकदाराला सर्व राजकीय पक्ष मतभेद विसरून प्रोत्साहन देतात. त्यामुळे तेथील वातावरण गुंतवणुकदारांसाठी फारच चांगले आहे. कांही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही असे वातावरण होते मात्र आता ते राहिले नसल्याने नवीन उद्योजक गुजरात, ओडिशा आणि बिहारकडे वळत आहेत.

Leave a Comment