पुणे,- शहरातील विकास कामे करतांना जर कोणी अधिकारी किंवा नगरसेवक टक्केवारी घेत असतील अशा अधिकारी आणि नगरसेवकांची नावे ठेकेदारांनी पुराव्यासह जाहीर करावीत अशांवर कडक कारवाई करू असे उपमु‘यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक‘मात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील, आणि खजिनदार सुकृत करंदीकर व्यासपिठावर उपस्थित होते.
अधिकारी, नगरसेवक टक्केवारी घेत असतील कारवाई करू – अजित पवार
नुकत्याच झालेल्या पावासामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ते करणार्या ठेकेदारांवर आणि अधिकार्यावर टिकेची झोड उठवण्यात आली होती. या टिकेला उत्तर देतांना काही ठेकेदारांनी शहरातील रस्त्यासहित अन्य विकास कामे करतांना महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक टक्केवारी घेतात असा आरोप केला होता त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी शहरातील काही ठेकेदारंानी नगरसेवक आणि अधिकार्यावर पैसे घेण्याचा जो आरोप केला तो आरोप फेटाळून लावत पैसे घेणार्या अधिकार्यांची आणि नगरसेवकांचर नावे आरोप करणार्या ठेहकेदारांनी पुराव्यासह जाहीर करावीत आशा अशांवर कारवाई करू मग तो माझ्या पक्षाचा असेल तरी त्याला पाठीशी घालणार नाही.
शहरातील मेट्रोचा प्रकल्प राबवतांना काही किचकट अडचणीी निर्माण होतात त्यामुळे त्याचा परिणाम विविध विकास कामे रखडणार्यावर होत असतो तशाच काही अडचणी पुणे शहरातील मेट्रो कल्पाबाबत निर्मार झाल्याने मेट्रो पकल्प रखडण्यावर झाल्याची कबुलही पवार यानी यावेळी बोलतांनाा दिली. ते म्हणाले की असे काही प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो पण काही संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे काही कार्यकर्ते या प्रकल्पाची बाजू समजून न घेता प्रकल्पा विरोधात आंदोलन करतात वेळप्रसंगी ते न्यालयातही जातात त्याचा परिणाम प्रकल्प थांबण्यावर होतोे त्याचे उदाहरण म्हणून जंगली महाराज रस्त्यावर चालू असलेल्या भुयारी मार्गाचे काम न्यायालयीन प्रकि‘येमुळे थांबलेले आहे.
मेट्रो प्रकल्प जमिनी खालून कि वरून राबवायचा या बाबतही तज्ञांची वेगवेगळी मते आहेत हा प्रकल्प जमिनीखालून राबवायचा म्हटले तरी त्यासाठी लागणारा खर्चही सर्व सामान्यांना न परवडणारा आहे हे एक कारण हा प्रकल्प रखडण्यावर झाला आहे. असे असली तरी या प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध करून हा प्रकल्प कसा लवकर मार्गी लगेल यासाठी माझा प्रयत्न राहील असेही पवार यांनी शेवटी सांगितले. चौकट–विरोधी पक्षांनी केलेल्या विराधामुळे रखडलेल्या जैतापूर वीज प्रकल्पाचे कामही लवकर सुरू होईल या प्रकल्पात जागा जाणार्या शेतकर्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई सुद्धा शेतकरी आता घेऊन जात आहे त्या ठिकाणी काम करणारे प्रांताधिकारीही माझ्याच नावाचे ( अजित पवार ) आहेत हा अजित पवार इकडे कसाही काम करीत असला तरी तो अजित पवार मात्र चांगले काम करीत आहे. या अजित पवार यांच्या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला.
