‘माझा मी’चे म्युझिक लॉन्च

एव्हीएनव्ही मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत आणि अतुल वनगे व निनाद वनगे यांची निर्मिती असलेल्या माझा मी’ सिनेमाची ध्वनिफित प्रसिद्ध संतुरवादक पं. उल्हास बापट यांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या रंगीबेरंगी सोहळ्यात कलाकारांच्या डान्स फरफॉर्मन्सने एक वेगळाच रंग भरला. या प्रकाशन सोहळ्याला माझा मी’ तील कलाकार अभिनेता प्रसाद ओक, अतुल तोडणकर, उदय टिकेकर, माधव देवचके, अभिनेत्री मनीषा केळकर, समीधा गुरू, नंदिनी वैद्य, श्रृती वनगे तसेच निर्माते अतुल वनगे व निनाद वनगे, संगीतकार सुभाष वनगे, गायक मंदार आपटे, मंगेश चव्हाण हे उपस्थित होते. दिग्दर्शक निनाद वनगे हे माझा मी’च्या माध्यमातून निर्मिती सोबतच दिग्दर्शनात पदार्पण करीत असून येत्या 23 ऑगस्टला माझा मी’ महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

Leave a Comment