साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे, : आगामी वर्षात सासवडयेथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या 87 व्या मराठी साहित्य संमेलनातील महत्वाची निवडणूक प्रक्रिया दि.31 जुलैला सुरु झाली असून ते दि.16 ऑक्टोबररोजीपर्यंत चालणार आहे. या निवडणुकीत अंदाजे 1200 मतदार आहेत. , अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,अध्यक्षपद निवडणूक 2013-14 च्या साहित्य संमेलनाच्या या महत्वाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 31 जुलैपासून सुरू झाला आहे. घटक, समाविष्ठ, सलग्न, निमंत्रक संस्थांकडून मतदार याद्या महामंडळाकडे पोहचल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार निर्वाचन अधिकार्‍याने अंतीम मतदार यादी जाहीर करण्याची दि. 11 ऑगस्ट, नियोजित अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 17 ऑगस्ट, उमेदवारांनी नावे मागे घेण्याची अंतीम तारीख 24 ऑगस्ट, मतदारांकडे मतपत्रिका पोस्टाने पाठवण्याची तारीख 4 सप्टेंबर तर मतपत्रिका महामंडळाकडे पोहोचण्याची अंतीम तारीख 15 ऑक्टोबर आहे. 16 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा केली जाईल.यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिल महाजन उपस्थित होते. दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक कमिटीची बैठक होणार आहे. त्यावरून 17 ऑगस्ट रोजी संमेलनाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे वैद्य यांनी सांगितले.

यावेळी अनेक मान्यवर साहित्यिकांनी ‘आपल्याला अध्यक्षपद मिळाले तर चालेल पण आम्ही निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका घेतली होती,त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ माधवी वैद्य म्हणाल्या, सहित्य महामंडळ पुण्यात आल्यापासून साहित्य संमेलनाची निवड बिनविरोध व्हावी, अशी महामंडळाची अपेक्षा होती. परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना बाजू मांडण्याचा हक्क नसतो. त्यामुळे या निवडणुकीकडे आम्ही तटस्थपणे पाहणार आहोत. मात्र, जर अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली तर महामंडळाकडून त्याचे स्वागतच होईल.
———————————-

Leave a Comment