कोल्हापूर – जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी हल्ल्यात मराठा रेजिमेंटचे मुळचे कोल्हापूर येथील असणार्या पुंडलिक माने यांच्यासह 5 जवान शहीद झाले आहेत. तर संभाजी कुटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुंछच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाकच्या हल्यात कोल्हापूरचा पुंडलिक माने शहीद
पुँछ जिल्ह्यातील चक्कां दा बाग या लष्काराच्या चौकीवर पाकिस्तानने पहाटे हल्ला केला. जम्मूपासून पावणे तीनशे किलोमीटरवर असणार्या सरवा पोस्टजवळ पाकिस्तानी सैनिकांनी हा हल्ला केला. भारतीय जवान सकाळी तीन ते चार च्यादरम्यान गस्त घालत असताना हा हल्ला झाला.
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील मराठा रेजिमेंटचे 34 वर्षीय नाईक सुभेदार पदावर कार्यरत असणारे पुंडलिक केरबा माने (हवलदार) यांना या हल्यात वीरमरण आले आहे. शहीद जवान माने यांचे कुटुंबीय अत्यंत गरीब आणि प्रामाणिक आहे, त्याचे वडील, आई, भाऊ हे शेती करून
उपजीविका चालवतात.
1998-99 मध्ये कोल्हापुरात पुंडलिक हा आर्मी मध्ये भर्ती झाला . त्याने सीमेवर अखंड पणे 14 वर्षे सेवा केली आहे. त्याच्या सेवेतील 2 वर्षे शिल्लक राहिल्याची माहिती गावकर्यानी दिली असून त्याच्या निधनाची माहिती समजताच पिंपळगाव बुद्रुक पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
