… तर तुम्ही इटलीत जाणार का- तावडे

मुंबई: उद्योग मंत्री नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणेंनी यांनी केलेल्या वक्त्यला त्याच शब्दात उत्तर देऊन विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी त्यांना तोंडघासी पाडले आहे. आगामी काळात सोनियांवर प्रेम करणा-यांनी इटलीत जावे असा टोला शेलक्या शब्दात विनोद तावडे यांनी लगावला. या पुढील काळात राजकीय नेत्यांनी आपल्या प्रग्लभतेचे भान ठेवून वक्तव्य करावीत, असा मैत्रीपूर्ण सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा कोणताही विकास केलेला नाही, हे फक्त नाटक असल्याची टीका करत गुजरातची खूप प्रगती झाली आहे, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी गुजरातमध्ये जा, असं नितेश राणे यांनी म्हटले होत. तसेच गुजरातचा विकास होत नसल्यानेच, गुजराती मुंबईत येतात, असं ते म्हणाले होते.

गुजरातबद्दल प्रेम वाटणा-यांना गुजरातमध्ये जायचे असेल तर, सोनियांवर प्रेम करणा-यांनी इटलीत जायचं का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केला. त्यानंतर नितेश राणे यांनी गुजरातींबाबत केलेल्या वक्तव्याचे विपर्यास केल्याचा दावा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला. तसेच नितेश यांनी गुजरातींना नव्हे तर मोदींचे कौतुक कऱणा-यांना ‘चले जाव’ म्हटल्याचे स्पष्टीकरण राणेंनी दिले.

Leave a Comment