सनी करणार आता हाणामारी

छोट्या पडद्यावरील बिग बॉस-५ मधून पॉर्न स्टार तथा अभिनेत्री सनी लिऑनने मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सनी लिऑनने आता बॉलीवूडमध्ये चांगला जम बसविला आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सनीच्या बॉलिवूडमधील हॉट एन्ट्रीनंतर आता ती ऍक्शन भूमिकेत आपले नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक देवांग ढोलकीया यांच्या ‘टीना एंड लोलो’ या सिनेमात सनी आता हाणामारी करताना दिसणार आहे. नुसते अंगप्रदर्शनच नव्हे तर अभिनय सुद्धा करत असल्याचे तिने सर्वाना दाखवून दिले आहे.

गेल्या काही दिवसापासून ती अक्शन फिल्ममधली आपली भूमिका चांगल्या पद्धतीने निभावण्यासाठी सनी सध्या ट्रेनिंग घेत आहे. ‘टीना एंड लोलो’ या सिनेमाचे शूट लवकरच सुरू होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी कळत येत असलेला ‘टीना एंड लोलो’ हा सिनेमा पूर्णपणे ऍक्शन पट असून सनी आपल्या भूमिकेबद्दल खूप आनंदी आहे आणि ती खूप मेहनतही करत आहे.

बिग बॉस-५ मधून एन्ट्री केलेल्या सनीने त्यानंतर प्रसिद्ध निर्मात महेश भट्टच्या जिस्म-२ मध्ये तिने आपल्या उपस्थितीची जाणीव करुन दिली. यानंतर तिचा येणारा दुसरा चित्रपट म्हणजे `रागिनी एमएमएस-2`, शिवाय सनी ‘जॅकपॉट’ या चित्रपटातही काम करत आहे. नुसते अंगप्रदर्शनाच नव्हे तर अभिनय सुद्धा करत असल्यचे तिने सर्वाना दाखवून दिले आहे.

Leave a Comment