शाहरुख करणार क्वीज शो होस्ट

किंग खान शाहरुख लवकरच एक क्वीज शो होस्ट करताना दिसणार आहे. हा क्वीज शो आपल्याला स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या “दिया और बाती हम” या मालिकेत पाहायला मिळणार आहे.मालिकेत पाहुणा कलाकार म्हणून येऊन शाहरुखने आपल्या ”चेन्नई एक्सप्रेस” या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा नवा फंडा शोधला आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवुडची अनेक मंडळी छोट्या पडद्यालाच आपली पसंती देतात.गेस्ट अपिरंस म्हणून कलाकार आपल्या चित्रपटाच प्रमोशन करताना दिसतात. “दिया और बाती हम” या मालिकेतील संध्या “सब से बडा चॅंम्पीयन” या क्वीज शो मध्ये सहभागी होणार आहे.या शो च होस्टिंग खुद्द शाहरुख खान करणार आहे. याच शुटींग पूर्ण झाल असून लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment