झिम्बावब्वेडचा निम्मा संघ गारद

हरारे- टीम इंडिया विरूद़च्या मालिकेत व्हाईटवॉश टाळण्याच्या उद़देशाने मैदानात उतरलेल्या यजमान झिम्बाब्वेला सुरूवातीलाच पाच धक्के बसले आहेत. त्यामुळे आगमी काळात व्हाईटवॉशची नामुष्की टाळण्याची पाळी यजमान झिम्बाब्वेवर आली आ‍हे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. चौथ्या वनडे सामन्यांत पदार्पणातच वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बळी घेतला. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा झिम्बाब्वेने १७ षटकात पाच बाद ४९ धावा केल्या होत्या.

चौथ्या वन डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून झिम्बाडब्वेचला प्रथम फलंदाजी दिली. टीम इंडियाने शिखर धवनला विश्रांती देवून चेतेश्वेर पुजाराला पदार्पणाची संधी दिली तर विनयकुमारच्या जागेवर मोहित शर्माही आज पदार्पण करत आहे. मोहित शर्माने झिम्बाब्वेचा सलामीवीर सिकंदर राजाला सात धावांवर बाद केले. एका अप्रतिम आऊटस्विंगरवर राजा बाद झाला.

अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाने झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. हॅमिल्टान मसाकाद्झाला त्यातने थेट फेक करुन धावबाद केले. त्याबने दहा धावांची खेळी केली. तत्पुर्वी, टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने झिम्बाच्या फलंदाजांना जखदुन ठेवले होते. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी अहमद यांनी दमदार गोलंदाजी केली. त्यानंतर जयदेव उडनकटने एक तर रवींद्र जडेजाने दोन गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा झिम्बावब्वे चा निम्मान संघ ४९ धावात गारद झाला होता.

Leave a Comment