यशवंत सिन्हापण आता मोदीच्या पाठीशी

नवी दिल्ली – आगामी काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील असे ठामपणे सांगत खासदार यशवंत सिन्हा हे मोदीच्या पाठीशी खंबीरपणे उभारले आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावरून तळयात-मळयात करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी कोलांटउडी मारल्याने राजकीय वतूर्ळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यासोबतच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासघातकी असल्याचा आरोप केला आहे.

भाजपमधील सर्वच नेते मंडळीनी आता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहण्याचे ठरविले आहे असे दिसते. पक्षाचेच आणखी एक खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी असहमती दर्शविली. नितीशकुमार हे जरी पंतप्रधान बनण्यास लायक असले, तरी ते विश्वासघाती आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.

गेल्या विधानसभा निवडणूकीत बिहारमध्ये भाजपने संयुक्त जनता दलापेक्षा चांगली कामगिरी केली असतानाही, त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी आमच्यासोबतची आघाडी मोडली. आमच्या कोणत्याही मंत्र्याने बिहारमध्ये राजीनामे दिले नाहीत.नितीशकुमार यांनीच आमच्या सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. एकंदरीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी कोलांटउडी मारल्यांने राजकीय वतूर्ळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment