शिल्पा शिरोडकर झळकणार छोट्या पडद्यावर

गेल्या १३ वर्षापासून गायब झालेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. तिने आपल्या अभिनयाने १९८० ते ९० साली प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. तिने अनिल कपूर सोबत ‘किशन कन्हैया’ या लोकप्रिय सिनेमांमध्ये केलेली भूमिका सर्वांना चांगलीच भावली होती. त्यामुळेच पुन्हा एकदा शिल्पा लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

शिल्पाने २००० साली अपरेश रंजीतशी विवाह केल्यानंतर अभिनय सोडून लंडनला वास्तव्यास गेली होती. मात्र आता तिने पुन्हा एकदा अभिनय करायचे ठरविले आहे. आगामी काळात शिल्पा छोट्या पडद्यावरील ‘एक मुट्टी आसमान’ नावाच्य नव्या मालिकेत मोलकरणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका घरात काम करणा-या मोलकरणींच्या आयुष्यावर आधारित आहे. याबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, ‘मला आवडत असलेल्या विषयाच्या‍ माध्यामातून या मालिकेद्वारे पुनरागमन करत असल्याने मी फारच खुश आहे. मोलकरणींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. या मालिकेद्वारे मला लोकांची मानसिकता बदलायची आहे.’

आगामी काळात हे काम करीत असताना एखादा सिनेमात काम करण्य्ची संधी मिळाली तर मी काम करण्यागस तयार आहे. ब-याच दिवसाच्या विश्रांतीनंतर मला काम करण्याची संधी मिळाल्याने मी सध्या खूपच खूष आहे असेही शिल्पा म्हणाली.

Leave a Comment