नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या हालचाली सध्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे येथील काही नेतेमंडळीनी आंध्र प्रदेशच्या अखंडतेचा आग्रह धरत व आगामी काळात होणा-या विभाजनाला विरोध करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. त्यामुळे आता आगमी काळात पंतप्रधान सिंग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टरमंडळात केंद्रीय मंत्री एम. एम. पल्लमराजू यांच्याससह के. एस. राव, चिरंजीवी आणि डी. पुरंदेश्वरी तसेच इतर खासदारांनी आंध्र प्रदेश अखंड राखण्याची मागणी केली. वेगळे तेलंगण राज्य निर्माण करणे हे राज्य व केंद्र सरकाच्या हिताचे नसल्याची बाब या शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे समजते.
दरम्यान, ज्येष्ठ कॉँग्रेस नेते व आंध्र प्रदेश कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये तेलंगण मुद्दयावर उच्चस्तरीय चर्चा झाली. आंध्र प्रदेश कॉँग्रेसचे प्रभारी तसेच सरचिटणीस दिग्विजय सिंह आणि गुलाम नबी आझाद यांच्याशी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी स्वतंत्र चर्चा केली. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीत वेगळे तेलंगण राज्य निर्माण करण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्याळमुळे आगामी काळात वेगळया तेलंगणाची निर्मिती केली जाण्या ची शक्य ता आहे.