करीनाने घेतली तीन आठवडे सुट़टी

आगामी काळात सैफ आली खानचा बर्थडे आहे. त्यासाठी अभिनेत्री करीना कपूर लॉस एंजिलिसला चालली आहे. त्यामुळे तीने कामाला तीन आठवडे ब्रेक दिला आहे. पुढच्‍या महिन्यात १६ तारखेला सैफ अली खानचा ४३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा प्राइवेट सेलिब्रेशन करीना पती नवाब सोबत करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ त्याच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी लॉस एंजिलिसला गेला आहे.

तसे पाहिले तर त्यांचे लग्न होवून बरेच दिवस झाले मात्र करीना आणि सैफला दोघांना एकत्रित वेळ घालविता आला नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वीच करीना वेळ देत नसल्याची तक्रार पति सैफ अली खानने उघडपणे केली होती. त्यामुळे करीनाने आता सुटी घेतली आहे. सैफ फक्त इंग्लिश बोलत असल्याने गेल्यो काही दिवसांपासून करीनाची देखील हिंदी बोलन्याची सवय मोडली आहे. मात्र ज्या वेळी तो हिंदी बोलतो त्यावेळी त्याच्या सोबत बोलण्यास कोणी तयार होत नाही असेही करीनाने यावेळी सांगितले.

आमच्यात काही मतभेद असले तरी नवीन पती पत्नीत अश काही अडचणी सुरूच असतात. त्यामुळे त्यायके आम्ही दोघेपन फारसे लक्ष देत नाही. मी नेहमीच सैफने दिलेल्या सर्व काही कामाचे तंतोतत पालन करीत असते त्याहमुळे सध्या तर आम्ही खूप एन्जाय करीत आसल्याचेही करीनाने यावेळी सांगितले.

Leave a Comment