करण आणि रेमोसुध्दा माधूरीचे दिवाने

बॉलीवुड दिग्दर्शक करण जौहर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा हे दोघेपण अभिनेत्री माधुरी दीक्षितचे दीवाने आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या तेजाब या सिनेमातील ‘एक दो तीन’ या गाण्याचे दीवाने असल्याचे दोघानेही कबूल केले आहे. करण जौहरने डासिंग रिएलिटी शो ‘झलक दिखला जा’ सीजन-६ च्या मंचवरच हा खुलासा केला.

करण म्हनाला, सुरूवातीपासूनच मी माधुरी दीक्षितच्या डान्सचा दिवाना आहे.एक वेळी मी व आदित्य चोप्रा तेजाब हा सिनेमा पाहण्यासाठी गेलो होतो. मात्र आम्ही जाईपर्यंत माधुरीचे एक दो तीन हे गाणे संपले होते. त्यामुळे आम्ही दोघांनी पुन्हा एकदा लगेचच पुढच्या शो चे तिकीट काढून हे गाणे बघितले.’

माधुरीवर खलनायक सिनेमात चित्रीत करण्यात आलेले ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याला सुध्दा मी खूपच दीवाना आहे. या गाण्यामध्ये‍ खूपच उर्जा आहे. त्यामुळे आजही ही गाणे मला आवडते, असे करण म्हणाला. करणचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली की मी सुध्दा या गाण्यानंतर पहिल्यांदा शिटी वाजवली होती. रेमो डिसूजा म्हणाला, ‘मी सुध्दा कित्ये‍क दिवसांपासून माधुरीचा प्रशंसक आहे. तेजाब सिनेमा बघायला गेल्यानंतर एक दो तीन हे गाणे सुरू झाले होते. गाणे संपेल म्हणून मी सीट शोधण्याचे सोडून शिडीवर बसूनच गाणे बघितले.’

Leave a Comment