चदिगड- हेरॉइन प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून बॉक्सिंगपासून दूरवलेला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग लवकरच पुनगरामन करण्याची तयारी करीत आहे. लवकरच पातियाळा येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विजेदंरसिंग सहभागी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेदरसिंग सोनिपत येथे सराव करत आहे. पतियाळा येथील सराव शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती विजेंदरसिंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
आगामी काळात १६ ते १८ ऑगस्टदरम्यान होणा-या सराव शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंचा निवड समिती विचार करणार आहे. बॉक्सर विजेंदरसिंग लवकरच एनआयएस पतियाळा येथे सराव करताना दिसेल. तो शनिवार व रविवारपासून सरावाला प्रारंभ करण्याची आशा आहे.येत्या ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणा-या व भारतीय बॉक्सिंग संघाचे सराव शिबिर पतियाळात होणार आहे. संघटनेच्या नियमानुसार सराव शिबिरात सहभागी न झालेल्या खेळाडूंची निवड केली जाणार नाही. यासाठी विजेंदरलाही या शिबिरात सहभागी होणे आवश्यक आहे. विजेंदरने पतियाळा येथे येत असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली.