अनिल कपूरनी दिली सोनमला टिप्स

अभिनेत्री सोनम कपूरचे ‘रांझणा’ आणि भाग मिल्खा भाग’ हे दोन सिनेमे हिट झाले आहेत. त्यामुळे सध्या तिला आकाश ठेंगणे वाटत आहे. अनिल कपूरने पण अभिनेत्री सोनम कपूरप्रमाणेच असफलता आणि सफलता या दोन्हीचा त्याच पध्दतीने स्वीकार केला आहे. त्यामुळेच अनिलकपूरने या निमित्ताने सोनमला काही टिप्स दिल्या‍ आहेत.

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेले सोनम कपूरचे ‘रांझणा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ हे दोन सिनेमे एक बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. ‘रांझणा’ च्या यशानंतर आयोजीत पार्टीमध्ये अनिल कपूर म्हणाला, ‘आगामी काळात पण सोनमने अशाच प्रकारे काम करावे. यशाने हुरळून न जाता काम केल्यास आपण नेहमीच यशस्वी होतो. आगामी काळात तिला जर आणखी यशस्वी व्हायचे असेल तर तिने नेहमीच यशाने हुरळून जावू नये तर अपयशाने खचून जावू नये या दोन गोष्ट जर पाळल्या तर माणूस निश्चीतच यशस्वी होईल.

२००७ मधील ‘सांवरिया’ या सिनेमानंतर तिला ब-याच दिवसांनतर पहिल्यांदा यश मिळाले आहे. सोनमने या दोन सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्या‍मुळेच तिला एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पुढे येता आले. ‘रांझणा’ सिनेमात तिने दक्षिण भारतीय अभिनेता धनुष सोबत काम केले आहे तर ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमात अभिनेता फरहान अख्तर सोबत काम केले आहे. आगामी काळात सोनमचा यशराज फिल्म्सचा अभिनेता आयुष्मान खुराना सोबतच्या‍ ‘खूबसूरत’ या सिनेमाच्या रीमेकमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment