इलेक्ट्रोनिक स्कीन तयार करण्यात यश

वॉशिग्टन दि.२३ – रोबो तंत्रज्ञान आता चांगलेच रूळले आहे.या रोबोला स्पर्श करताच त्याच्या अगदी संवेदनशील त्वचेचा अनुभव घेता आला तर, असे जर तुमच्या मनात येत असेल तर ही गोष्ट आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. स्पर्श करताच प्रकाशमान होणारी कागदासारखी पातळ कृत्रिम त्वचा किवा इ-स्कीन कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे. या त्वचेवर तुम्ही तिजका अधिक दाब द्याल तितकी ती अधिक चमकदार दिसेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या संशोधन पथकाचे प्रमुख अली जावे यांच्या म्हणण्यानुसार लवचिक प्लॅस्टीकवर प्रथमच इंटर अक्तीव्ह नेटवर्क बसविण्यात संशोधकांना यश आले आहे. ही इ-स्कीन केवळ रोबोसाठीच नाही तर अन्य अनेक कारणांसाठी वापरता येणार आहे. रोबोला ती गुंडाळली तर त्याला स्पर्श करताच आपल्याला त्वचेचा फील येईल. वॉल पेपर टचस्क्रीन सारखे वापरता येणे, कारचे डॅशबोर्ड, हाताला बँडेज प्रमाणे बांधल्यास हेल्थ मॉनिटर म्हणूनही ही स्क्रीन उपयुक्त ठरणार आहे. ती रक्तदाब चेक करणे, पल्स रेट पाहणे अशा कामांसाठीही उपयोगात येईल असे त्यांचे म्हणणे आहे.