डॉल्फिनही एकमेकांना नावाने पुकारतात

पृथ्वीवरील जिवंत जातीत माणसेच एकमेकांना नावाने ओळखतात आणि हाका मारण्यासाठी या नावांचा उपयोग करतात असा आपला समज असेल तर तो खोटा ठरेल असे नुकत्याच एका संशोधनात आढळून आले आहे. समुद्रात असणारे सस्तन डॉल्फिन मासेही एकमेकांना नावाने पुकारतात असे संशोधकांना दिसून आले आहे. सेंट अँड्रूज विद्यापीठ स्कॉटलंड येथील संशोधकांनी हा शोध लावला आहे.

या प्रयोगात अनेक डॉल्फिन माशांची निरीक्षणे नोंदविली गेली तेव्हा असे आढळले की हे डॉल्फिन एकमेकांना पुकारताना विशिष्ठ पद्धदीने शीळ घालतात ते कदाचित संबंधिक डॉल्फिनचे नांव असू शकते. कारण विशिष्ठ प्रकारच्या शीळेला ठराविक डॉल्फिनच प्रसिसाद देतात. डॉ. विन्सेन्ट जनिक यांच्यामते डॉल्फिन त्रिमितीय वातावरणात राहातात. त्यांना कुणल्याही लँडमार्कची गरज नसते. ते एकत्र कुटुंबाप्रमाणे राहतात.

पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की डॉल्फिन सतत शिट्या मारतात. मात्र ते तसे नसते तर या शिट्यांवरून ते एकमेकांना बोलावत असतात. प्रत्येक माशानुसार वेगळ्या पद्धतीने शिटी वाजविली जाते. संशोधकांनी त्यांचे हे आवाज अंडर वॉटर रेकॉर्ड करून घेतल्यानंतर ही बाब उघड झाली. हे रेकॉर्ड केलेले आवाज दुसर्‍या ठिकाणी राहणार्‍या डॉल्फिनना ऐकविले गेले तर त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. मात्र जेथे आवाज रेकार्ड केले तेथेच ते ऐकवले तर मात्र त्या आवाजांना प्रतिसाद मिळतो असे दिसून आले. डॉल्फिन बरेच वेळा एकमेकांना पाहू शकत नाहीत अथवा पाण्यात असताना त्यांना गंधही येत नाही मात्र या शिट्टांवरून ते एकमेकांना ओळखू शकतात व आपल्या नावाची शिट्टी असेल तर त्वरीत प्रतिसाद देतात असे संशोधकांना दिसून आले.

Leave a Comment