लंडन – लॉर्ड्स मैदानावरील दुसरी कसोटी सामन्यात इंग्लंडने कांगारूवर ३४७ धावांनी मात केली. इंग्लंडने सलामीवीर रूटच्या दमदार खेळीने उभारलेला ५८३ धावांचा डोंगर करताना ऑस्टेलियाची पुरेशी दमछाक झाली. प्रत्युत्तरात कांगारूंना दुस-या डावात २३५ धावांत गुंडाळून इंग्लंडने चौथ्या दिवशीच विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
चौथ्या दिवशी इंग्लंडने ५ बाद ३३० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यजमानांना रूटच्या द्विशतकाची प्रतीक्षा होती. मात्र, रूट १८० धावा काढून बाद झाला. रूट बाद होताच इंग्लंडने आपला दुसरा डाव ७ बाद ३४९ धावांवर घोषित केला. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. भरवशाचा सलामीवीर शेन वॉटसन (२०) सर्वात आधी तंबूत परतला. अँडरसनने त्याला पायचीत केले. रोजर्सला सहा धावांवर स्वानने त्रिफळाचीत केले. चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या फिलिप ह्युजेसला स्वानने पायचीत करून कांगारूंना आणखी एक धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची टीम ३ बाद ३६ अशी संकटात सापडली होती.
यानंतर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार मायकेल क्लार्क यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. मात्र, हे दोघे बाद होताच ऑस्ट्रेलियाची मधली फळी कोसळली.
दिवसाच्या अखेरच्या षटकात ग्रीम स्वानने पॅटिन्सनला बाद करून इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून स्वानने सर्वाधिक चार विकेट तर अँडरसन, रूट आणि ब्रेसनन यांनी दोन-दोन गडी बाद केले.दुस-या कसोटीत इंग्लंडच्या रूटने दमदार प्रदर्शनाच्या बळावर मैदान गाजवले. त्यांने फलंदाजी करताना १८० धाव केल्यान तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे उस्मान ख्वाजा आणि कर्णधार मायकेल क्लार्क खेळपट्टीवर स्थिरावले असताना या दोघांच्या महत्त्वाच्या विकेतही रूटनेच घेतल्या .