अभिनेता मनोज कुमार हॉस्पिटलमध्ये

जुन्या काळातील प्रसिध्द अभिनेता मनोज कुमार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना काही दिवसांमध्ये घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशभक्तीच्या चित्रपटांमध्ये अभिनय आणि त्यांचे दिग्दर्शन करण्यासाठी मनोज कुमार प्रसिद्ध आहेत. १९९२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र गेल्यार दोन दिवसांपासून त्यांतची तबयेत अचानक बिघाडल्याने त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यायत आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकतीत सुधारणा होत आहे.

कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अभिनेता मनोज कुमार यांच्यावर उपचार करीत असलेले डॉ. शर्मा म्हणाले की, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना होत असलेला त्रास थांबला आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात येईल.

Leave a Comment