सलमान करणार बिग बॉस मध्ये डबल रोल

बॉलीवुडचा टायगर सलमान खान आता आगामी काळात बिग बॉस मध्ये डबल रोल करणार आहे. यापूर्वी जुड़वा या सिनेमात देखील सलमान खानने डबल रोल केला होता. या सिनेमात त्याने साध्या आणी टपोरी युवकाचा रोल केला होता. त्यावेळी हा सिनेमा हिट देखील झाला होता. त्यामुळे त्यांनी आगामी काळात येत असलेल्या कलर्स वाहिनीवरील रियाल्टी शो बिग बॉस मध्ये डबल रोल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रियलिटी शो बिग बॉस साठी आगामी काळात अभिनेता सलमान खान एक खास प्रोमोची शूटिंग करणार आहे. ज्‍यामध्ये तो एक साध्या आणि सरळ युवकाची भूमिका करणार आहे. तर दुसरीकडे त्याच्या विरुदध म्हणजेच टपोरी युवकाची भूमिका करणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान चौथयांदा बिग बॉसच्या शो मध्ये होस्ट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्या‍मुळेच यावेळेस काही तरी वेगळे करण्याचा निर्णय खुद़द सलमान खानने घेतला आहे. आगामी काळात सलमान करीत असेलेली ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल असाच आहे. यावर्षी पासून बिग बॉसचा शो आक्टोबर ऐवजी संप्टेबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी पण या शो मध्ये एका क्रिकेटरचा सहभाग असणार आहे.

Leave a Comment