पूजा भट्ट आणि पोलिसात वाद

डायरेक्टर-ऐक्ट्रेस पूजा भट्टचे टीम सदस्य आणि उदयपुरचे पोलिस अधीक्षक यांच्यात रविवारी वाद झाला. त्यामुळे काही काळासाठी ‘बेड’ या सिनेमाच्या सेटवरील वातावरण तंग झाले होते. त्यामुळे काही वेळ शुटिंग थांबविण्यात आली होती. याबाबत पूजाने पोलिस अधिका-यांनी सिनेमाच्या सेटवर येवून अपमानास्पाद वागणूक देवून काही अपशब्द वापरला असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत माहिती देताना भोपालपुराचे पोलिस अधिकारी ज्ञानेंद्र सिंह म्हेणाले अभिनेत्री पूजा भट़टच्या ‘बेड’ या सिनेमाची उदयपुर कलेक्टर कार्यालयाच्यां परिसरात शूटिंग सुरू आहे. त्याच परिसरात उदयपुरचे पोलिस अधीक्षक हरिप्रसाद शर्मा यांचे देखील कार्यालय आहे. या शुटमुळे परिसरातील कार्यालय बंद होते. पोलिस अधीक्षक काही कामानिमित कार्यालयात आल्यानंतर त्यांना शुट युनिटमधील काही जणांनी शूटिंग चालू असल्याने केबीनमध्येल जाता येणार नसल्याचे सांगितले.

त्यासाठी त्यांना महेश भट्ट यांना फोन करून परवानगी घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिडलेले पोलिस अधिक्षक शर्मा आणि टीम सदस्यात वाद झाला. काही वेळानंतर हे प्रकरण मिटले. त्यामुळे कोणाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

याबाबत बोलताना अभिनेत्री पूजा भट़ट म्हनाली, ‘पोलिस अधीक्षकांना केवळ दोन मिनीट थांबण्या‍स सांगण्या‍त आले होते. मात्र ते दोन मिनीट देखील थांबले नाहीत. त्यानी यावेळी टीम मधील काही सहका-यांना धमकी दिली आणि अपशबद वापरले.’ पुलिस अधीक्षक शर्मा यांनी मात्र पूजा भट्टने केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे.

Leave a Comment