
नवी दिल्ली- गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येईल असा विश्वास व्यक्त करतानाच अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेमुळे फेब्रुवारीपर्यंत विकासदर 6.5 टक्के गाठणे अशक्य असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. पुढील 2013-14 या आर्थिक वर्षांत विकास दर काय असेल यासंदर्भात आता काही सांगता येणं अशक्य आहे.कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारतासह सर्व देशांचा विकास दर घटण्याची शक्यता वर्तवली आहे. अर्थसंकल्पामध्ये विकासह दर 6.5 टक्के असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.मात्र हा विकास दर 6.5 टक्क्यांपेक्षाही खाली असेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
