
नवी दिल्ली – एनडीएकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावासंदर्भात विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांची भेट घेतली. दरम्यान, त्यापूर्वी उद्धव यांनी असोचेम’च्या परिषदेला संबोधित केले. देशात आगामी सरकार हे आमचेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय यूपीएपेक्षा निश्चितच उत्तम सरकार देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. बर्याच दिवसांनी दिल्लीत आलो आहे. मुंबई- दिल्ली कॉरिडोर सुरू करणार
असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र ही सुविधा आमचं दिल्लीतील स्वागतासाठी असल्याचा टोमणा, उद्धव यांनी हाणला.
