आलीयावर चालला लुटेराचा जादू

बॉलीवुड मधील ‘लुटेरा’ या सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. त्याचवेळी ‘लुटेरा’ हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट़टने अशा स्वारूपाच्या एका तरी सिनेमात काम करण्याचे ठरविले आहे. तिला या सिनेमातील लुक आणि स्टाइल सुध्दा खूप आवडली आहे. त्यामुळेच त्यासिनेमाची जादू अलियावर सुध्दा झाली आहे.

‘लुटेरा’ हा सिनेमा पाहिल्यानतर आलिया म्हणाली, ‘ करियरमध्ये कमीत कमी एक वेळा तर मी अशास्वरूपाच्या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा केवळ भावुक आणि नाटकीय असा नाही तर यामधील फैशन सीन्स खूपच सुंदर आणि जीवंत आहेत. त्यामुळेच मला अशा स्वपरूपाच्या फैशन असलेल्या सिनेमात आगामी काळात काम करायाचे आहे.’

आलियाने या सिनेमातील सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंहच्या अभिनयाची तोंड भरून कौतुक केले. लुटेरा हा सिनेमा १९५० सालच्या एक लव स्टोरीवर आधारीत आहे. येत्या काळात आलियाचे खूप सिनेमे येत आहेत. आलियाने काही दिवसांपूर्वीच इम्तियाज अलीच्या ‘हाईवे’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे. येत्या काळात ती अर्जुन कपूरच्या सोबत ‘टू स्टेट्स’ या सिनेमाची शूटिंग करीत आहे.

Leave a Comment